धिंगरी आळिंबी व्यवसाय : व्यवसायाची पूर्व तयारी – अमर पडवळ

मशरूम हे बुरशी वर्गात येणारं, प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि विटामीन ने भरपूर असे अन्न आहे. खाण्याजोग्या मशरूमच्या एकूण 8 जाती आहेत. 1) button मशरूम 2) Oyster मशरूम 3) Paddy straw मशरूम 4) Shiitake मशरूम 5) Portobello मशरूम 6) Porcini मशरूम 7) Enoki मशरूम 8) Shimeji मशरूम. या लेखामध्ये आपण ओयस्टर मशरूमच्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. ओयस्टर मशरूम उगण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक म्हणजे cellulose. आपल्या शेतातून निघणार्‍या कचर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात cellulose उपलब्ध असते. उदाहरणार्थ : सोयाबीनचा,  गव्हाचा, भाताचा, भूस्सा.

मशरूम व्यवसाय असो व अन्य कुठलाही व्यवसाय त्याची सुरुवात ही मार्केटिंग किंवा त्या प्रॉडक्टची असलेली विक्रीची व्यवस्था/साखळी समजून घेण्यापासून करावी. त्यासाठी आधीपासून उत्पादन घेत असलेल्या व्यवसायिकाकडून ते प्रॉडक्ट घेऊन विकण्यास, मार्केटिंग करण्यास सुरुवात करावी . त्याचा फायदा असा होतो की तुमचं आणि त्या व्यवसायिकाच व्यावसायिक नात तयार होतं आणि त्याच्याव्दारे प्रॉडक्टच प्रॉडक्शन कसं घेतला पाहिजे, त्यात कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, त्यासाठी लागणारी गुंतवणूक किती, कच्चा माल कुठे कसा मिळेल, मशीनरी कुठे व कशी मिळेल, सुरूवातीला किती माल तयार केला पाहिजे आणि तो कुठे विकला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याआधीच माहीती होते आणि असा व्यवसाय तोट्यात जाण्याचे शक्यता नगण्य होते. तसेच या माहितीचा प्रोजेक्ट रीपोर्ट तयार करून तुम्ही बँकेत सादर करून सुरुवातीच्या गुंतवणूकिसाठी कर्ज देखील मिळवू शकता. 

पावसाळया मध्ये जागोजागी उगणार्‍या सफेद छत्र्या कुणी बघितल्या नसतील असे फार कमी व्यक्ति पाहावयास मिळतात. पण हेच भूछत्र आपल्या आरोग्यासाठी एवढ्या पोशक आहेत हे समजायला मात्र  आपल्याला 2021 यावं लागलं. मशरूम विषयी असणाऱ्या समज -गैरसमजाणमुळे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मशरूम आपल्या समाजात खाल्ले जात नाही. डिजिटल युगात आपल्या हेल्थला घेऊन समाज आता सुज्ञ होत आहे. त्याचा फायदा आपण आपल्या व्यवसायासाठी नक्कीच करून घेतला पाहिजे. 

इतर शेती मालाप्रमाणे मशरूमची घाऊक बाजारपेठ उपलब्ध नाही. म्हणून मशरूम विक्री करण्यासाठी हॉटेल्स, मॉल, परदेशात जास्त मागणी असल्याने एक्सपोर्ट करणारे, मशरूम पासून प्रॉडक्ट बनवून विकणारे विक्रेते, शहराच्या ठिकाणी असणारे भाजी विक्रेते अशा विक्रेत्यानपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष पोहचावे लागते. सबंधित विक्रेत्याशी स्वतः संवाद साधून त्यांना त्यांच्या जागेवर आपला माल पोहचवावा लागतो. त्यासाठी सुरूवातीलाच प्रयत्न करावेत. कुठलाही व्यापारी, कंपनी जागेवर येऊन माल घेत नाही. तसे कोणी सांगत असल्यास त्याची खातर जमा करून मगच पाऊल उचलावे. आम्हीच प्रशिक्षण देऊ, कच्चा मालही देऊ आणि तयार मालही आम्हीच घेऊ अशी योजना देऊन बर्‍याचदा फसवण्याचे उद्योग केले जातात. जर त्यांच्याकडे खरच मालाला मागणी असेल तर तेच स्वतः माल तयार करून विकतील न की तुम्हाला सांगतील, म्हणून याची पुर्णपणे खातर जमा केल्याशिवाय अशा ठिकाणी आपला पैसा गुंतवू नये. 

ओयस्टर मशरूम व्यवसायाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे यात कुठल्याही प्रकारे माल, कच्चा माल वाया जात नाही. म्हणजे लागणारा कच्चा माल (भुस्सा) तुम्ही कोरड्या जागी कमीत कमी एक ते दीड वर्षांसाठी सहज साठऊ शकता. विक्री होऊन उरलेले ताजे मशरूम नैसर्गिक रित्या  सुकवून एक वर्षभर त्याची साठवणूक करू शकता. सुकवलेले मशरूम, त्याची पावडर, सुकवलेले मशरूम वापरुन तयार केलेल्या पदार्थांना देखील बाजारात चांगली मागणी आहे. दोन ते तीन वेळा उत्पादन घेतल्यानंतर उरलेल्या भूशाचे आपण उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत (गांडुळ खत) तयार करून त्याचीही विक्री करू शकतो किंवा आपल्या शेतात वापरू शकतो.

 मशरूमचे सँपल आणि By-Products घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क – https://nirvanafresh.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top